देऊळवाडीतील मैदान झाले चकाचक.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 1 सप्टेंबर उरण शहरातील देऊळवाडी येथील शंकर मंदिरासमोर (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समोर )मोकळ्या मैदानातील कचरा साफसफाई करून त्या जागी रेती, ग्रीट, खडे टाकून मैदान स्वच्छ व सुंदर बनविण्यात आले.गणपती उत्सवासाठी मैदान बनविले.नगरसेवक राजू ठाकुर यांनी याकामी पुढाकार घेतला तसेच समाजसेवक रोहित नितीन पाटील, देऊळवाडी युवक मंडळ अध्यक्ष निरंजन अशोक नार्वेकर, उपाध्यक्ष प्रसाद म्हात्रे, तसेच देऊळवाडी युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी यांनी याकामी अथक परिश्रम घेतले. आणि देऊळवाडी परिसर स्वच्छ व सुंदर केला.सणासुदीच्या दिवसांत परिसर चकाचक साफ करण्यात आल्या बद्दल परीसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here