महात्मा गांधी विद्यालयात देशभक्ती गीत गायन स्पर्धा संपन्न

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा. अशोक डोईफोडे)
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे भारतीय स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहेत, या अंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहेत.
क्रांती दीना चे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे होते,
प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विभागात झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात देशभक्ती गीत सादर करून मंत्रमुग्ध केले,संपूर्ण वातावरण देशभक्तीमय बनविले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. बाळू उमरे व देवराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, संगीता गिरी यांनी केले,स्पर्धेचे परीक्षण प्रा आरजू आगलावे व स्वाती केळकर यांनी केले.
सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *