प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या न्याय हक्कांसाठी समर्थपणे लढणारे संघटन* *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

चंद्रपूर : प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी गेल्या 30 वर्षापासून विद्यापीठ व शासनस्तरावर लढा देणारी संघटना म्हणून नोंदणीकृत असलेल्या नागपूर विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचा नावलौकिक आहे. प्राध्यापकांच्या अनेक प्रश्नांमध्ये संघटना अविरतपणे लढा देत असून बहुजन, दलित आदिवासी, मागासवर्गीय व सर्वस्तरीय प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासासाठी व हितासाठी ही संघटना आधारस्तंभ बनली आहे.
यंग टीचर्स असोसिएशनची स्थापना झुंजार प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांनी केली. विद्यापीठ स्तरावर प्राध्यापकांना न्याय मिळावा, त्यांना आत्मनिर्भरतेने जगता यावे व त्यांना आपली कार्यतत्पर सेवा देता यावी या उद्दात हेतूने त्यांनी संघटनेची स्थापना केली. सर्वांना समान संधी मिळावी हा समतेचा विचार डॉ.बबनराव तायवाडे व त्यांचे विश्वासू सहकारी असलेल्या डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिला. व्यक्तिगत सुखदुःखाकडे दुर्लक्ष करत त्यांनी संघटनेच्या कामात स्वतःला झोकून दिले. परिणामतः आज यंग टिचर्स प्राध्यापकांच्या मनात पोहचली आहे.

 

2011 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर डॉ. प्रदीप घोरपडे यांनी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचा विस्तार केला. संघटना हीच आपल्या जीवनाची संपत्ती मानून संघटनेचे गोंडवाना विद्यापीठ स्तरावरील पहिले संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्राध्यापक हितासाठी भरीव योगदान दिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर संघटनेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ बनले. गोंडवाना विद्यापीठात संघटनेची दुसरी सक्षम फळी निर्माण करून नव्या दमाच्या उपक्रमशील डॉ.संजय गोरे व डॉ. विवेक गोर्लावार यांच्याकडे संघटनेचे नेतृत्व दिले.एकूण 56 नामवंत व विद्या व्यसंगी पदाधिकारी व विभाग समन्वयक असलेली एक मोठी कार्यकारिणी या संघटनेची असून यामध्ये डॉ.राजू किरमिरे, डॉ.प्रमोद बोधाने, डॉ.नंदाजी सातपुते, डॉ.प्रवीण तेलखेडे, डॉ विजय वाढई, डॉ.अक्षय धोटे, डॉ.श्रीराम गहाणे डॉ.दशरथ आदे, डॉ.राजेंद्र गोरे, डॉ.नरेंद्र हरणे, डॉ.शरद बेलोरकर, डॉ.राजेंद्र मुद्दमवार, डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ. सतीश कन्नाके, डॉ.संजय निंबाळकर, डॉ.सुदर्शन दिवसे, डॉ.लता सावरकर, डॉ.अपर्णा धोटे, डॉ.रुपेश कोल्हे, डॉ.अभय लाकडे , डॉ.किशोर कुडे, डॉ.निलेश चिमूरकर , डॉ.राजेंद्र झाडे, डॉ.गणेश चौधरी, डॉ. तात्या गेडाम, डॉ. प्रफुल्ल वैराळे, डॉ.निलेश हलामी
डॉ.अनिल शिंदे, डॉ.जनार्धन काकडे, डॉ.रामदास कामडी, डॉ. भास्कर लेनगुरे, डॉ.केवलराम कराडे, डॉ.संजय साबळे, डॉ, शशिकांत गेडाम, प्रा.वसंता चौहान, डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. शरद पाटील, डॉ.मनीष कायरकर, डॉ. गजानन राऊत, डॉ, गजानन खामनकर, डॉ.दीपक मोरांडे, डॉ. प्रफुल्ल बनसोड, डॉ.दिनकर चौधरी, डॉ. लोमदेव नागलवाडे, डॉ. राजेश सूर, डॉ, संजय दोनाडकर, डॉ.मितेश रामटेके, डॉ.संजय फुलझेले, प्रा.ललीतकुमार शनवारे, प्रा.दिलीप नंदेश्वर, प्रा.चंद्रशेखर गौरकर,डॉ.मनोहर कलोडे, प्रा.प्रफुल्ल शेंडे प्रा.स्नेहा मोहूर्ले, प्रा.सुहास शिवणकर डॉ.भगवान धोटे,डॉ.अपर्णा मारगोणवार,यासारखे व इतरही अनेक सक्रिय व नामवंत पदाधिकारी व विभाग समन्वयक यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीने आपल्या सक्षम नेतृत्वात अनेक महाविद्यालयांचे व प्राध्यापकांचे प्रश्न सोडवले असून ही संघटना सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकापर्यंत पोहोचली आहे. “आपली संघटना..आपल्या हक्काची संघटना” म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात या संघटनेने प्राध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या हृदयात मौलिक स्थान मिळवले आहे. एक विश्वासपात्र बनली आहे.

डॉ.संजय गोरे व डॉ.विवेक गोर्लावार यांनी संघटनेला उपक्रमशील व कार्य तत्पर ठेवत एकूण 65 चे वर विद्यार्थी, प्राध्यापक हिताचे व समस्यांबाबत निवेदन विद्यापीठ प्रशासन स्तरावर, शिक्षणमंत्री स्तरावर, व सहसंचालक स्तरावर या संघटनेने दिली असून अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम ग्रामीण आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त व्हावे तसेच विविध क्षेत्रात प्राध्यापकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने संघटनेने वेळोवेळी संघर्ष केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संसाधने, वनसंपत्ती, संस्कृती व आदिवासी परंपरा या सर्व घटकांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने संशोधन झाले पाहिजे ही आग्रही भूमिका संघटनेने मांडली. विद्यार्थ्यांना दर्जेदार संशोधन करता यावे यासाठी पीएचडी संशोधन प्रक्रियेतील अनेक अडचणी सोडवल्या. उदाहरणार्थ जुना प्रचलित नियम कायम केला, संशोधन प्रवेश प्रक्रिया, आराखडा, शुल्क याबाबत विशेष उल्लेख करता येईल. तसेच संशोधन केंद्रावर मार्गदर्शकांची व विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यामध्ये संघटनेचे महत्त्वाचे योगदान आहे.नुकतीच जागतिक स्तरावर आपत्ती ठरलेल्या संसर्गजन्य कोरोना साथरोग काळामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांच्या पाठीशी ही संघटना ठामपणे उभी राहिली असून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कमी करणे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित करण्यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन देऊन प्रश्न संघटनेने सोडवला आहे.

संघटना विविध प्रश्न व समस्यांसाठी प्राध्यापकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगाचे विविध हप्ते, नेट-सेट प्रभावित प्राध्यापकांना नियुक्तीपासून स्थाननिश्चिती मिळावी, एम. फिल धारण केलेल्या प्राध्यापकांना सेवेत संरक्षण व पदोन्नतीचा लाभ मिळावा, पीएचडी मार्गदर्शकांना पीजी टीचर म्हणून मान्यता मिळावी तसेच प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीची देयतारीख मान्य करावी, 2016 नंतर आचार्य पदवीप्राप्त अध्यापकांना वेतनवाढ मिळावी तसेच नोशनल, इन्क्रिमेंट प्राध्यापकांना प्राप्त व्हावे गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात, अकॅडमी स्टाफ कॉलेज तसेच सहसंचालक (उच्च शिक्षण) यांचे कार्यालय स्थायी स्वरूपात निर्माण व्हावे यासारखे अनेकानेक प्रश्न शासन दरबारी व विद्यापीठस्तरावर या संघटनेने प्रखरपणे वेळोवेळी मांडलेले आहे.

शारीरिक शिक्षण व ग्रंथालयशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रासाठी संघटनेने पुढाकार घेतला. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये शारीरिक शिक्षण व ग्रंथालयशास्त्र विषयाकरिता संशोधन केंद्र अत्यल्प असल्याचे संघटनेच्या लक्षात येताच संघटनेने दोन्ही उपरोक्त विषयांसाठी संशोधन केंद्राची मागणी करून संशोधन केंद्र का आवश्यक आहे हे आपल्या भूमिकेतून गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना पटवून दिले. या दोन्ही विषयाच्या संदर्भात विद्या परिषदेमध्ये संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये समिती गठित करण्यात आली. हे यश संघटनेचे असून या विषयावर संघटनेने अत्यंत तळमळीची भूमिका मांडली आहे.

शारीरिक शिक्षण व ग्रंथालयशास्त्र विषयक संशोधन केंद्र व्हावे यासंदर्भात संघटनेने मांडलेली भूमिका तसेच प्राध्यापकांसाठी अभ्यासेत्तर उपक्रम असलेली दिनदर्शिका निर्माण व्हावी याकरता केलेली मागणी लक्षात घेऊन कुलगुरूंनी संघटनेच्या विद्यापीठ विकासाच्या तळमळीची व कार्याची उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने प्रशंसा केली. एका पत्राद्वारे संघटनेच्या संकल्पनेची व कार्याची भरभरून प्रशंसा केली आहे. हे गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे मोठे यश मानले जाते.आपल्या अनेक कामांनी प्राध्यापकांच्या घराघरात व मनात पोहचली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *