सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्षपदी मंगेश घुबडे तर उपाध्यक्षपदी विजय बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये प्रीती ढूमने, रंजिता ढूमने, शितल चिलमुलवार, साईनाथ ठमके, बंडु धानोरकर, संजय दामेलवार, वंदना वैरागडे, सुशीला आत्राम, सुनील चौधरी, देवराव ढूमने यांची वर्गप्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ बुजोने सर यांनी निवड प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे संरपच शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, राजकुमार दामेलवार, मंगेश रायपल्ले, भास्कर भैयाजी मोरे, संजय ढुमणे, गमतीदास मावलीकर, भास्करराव मोरे, अमोल झुरमुरे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *