जगजीवन भोईर यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 8 ऑगस्ट
उरण तालुक्यातील द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष तथा कट्टर शिवसैनिक,सामाजिक कार्यकर्ते जगजीवन भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. एम एस. ई.बी प्राथमिक शाळा बोकडविरा या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले तर रमाबाई आंबेडकर वसतीगृह विंधणे येथील आदिवासी गरजू विद्यार्थ्याना भेट वस्तू देण्यात आले. जगजीवन भोईर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नातेवाईकांनी, मित्र परिवारांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम ते नेहमी राबवित असतात. वाढदिवसा निमित जगजीवन भोईर यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *