सेक्टर 12 द्रोणागिरी नोड रहिवासी संघा तर्फे ज्यादा ट्रान्सफार्मरची मागणी.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 जुलै उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड , सेक्टर-12 येथील ट्रान्सफॉर्मरचा रविवार दि. 24/7/2022 रोजी रात्री 9:30 वाजता मोठा स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मर जळाले. तेव्हापासून आजपर्यंत विज पुरवठा खंडित झाल्यामुळे सतत संपर्क करुण सुद्धा नविन ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) उपलब्ध झालेला नाही.एकीकडे उरण पनवेल विभाग औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत असताना त्याचा महत्त्वाचा अंग असलेल्या वीज पुरवठ्याबाबत मात्र इथे इच्छाशक्तीच्या अभावाचा अनुभव द्रोणागिरी नोड मधील नागरिकांना सतत येत आहे. त्यातच दोणागिरी, नोड, सेक्टर-12 येथील नव्याने कार्यान्वित झालेल्या वीज पुरवठा सयंत्रच्या आजूबाजूला मात्र अनेक वर्षापासून कार्यान्वित असलेल्या मोडकळीस आलेल्या खांबाला (विजेच्या ) तारेमधून विज पुरवठा केला जात आहे.त्यामुळे केव्हाही वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विज पुरवठा खंडित होणाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी व नागरिकांना योग्य ते चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सेक्टर 12 द्रोणागिरी नोड रहिवासी संघा तर्फे ज्यादा ट्रान्सफार्मरची मागणी महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

कोट (चौकट ):-
सहा.अभियंता जसखार यांचे सहकार्य लाभून सुद्धा आवश्यक साधने नसल्यामुळे वेळ जात आहे. महावितरण प्रशासनाने वेळीच सदर वस्तुस्थितीचा विचार करुण जिथे गरज आहे तिथे तातडीने केबल द्वारे विज पुरवठा करावा. जागतिक पटलावर असलेल्या उरण-पनवेल मध्ये विकास कामांच्या दृष्टीने वाटचाल करू पहाणा-या विभागासाठी जादा ट्रान्सफार्मर(रोहीत्र)ची उपलब्धता करण्यास यावी अशी मागणी सेक्टर 12 द्रोणागिरी नोड रहिवासी संघा तर्फे करण्यात आली आहे.
मदन अनंत पाटील
सेक्रेटरी – सेक्टर 12 द्रोणागिरी नोड रहिवासी संघ.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *