लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार ,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच .बी .मस्की होते.
सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित अतिथीनि लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राकेश ठवरे यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,