वन महोत्सव अंतर्गत आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते वृक्षारोपण.

लोलदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत कक्ष क्रमांक १६० मध्ये राजुरा विधानसभेचे लोकप्रीय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन “वन महोत्सव” साजरा करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की “आझादी का अमृत महोत्सव दरम्यान वन महोत्सव साजरा करताना खऱ्या अर्थाने वन विभाग ने मोलाची धुरा सांभाळली असुन सर्व जनतेने सुद्धा वृक्ष लागवड केली पाहिजे, वृक्षाचे संरक्षण व जतन केले पाहिजे.”
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, वन परिक्षेत्र अधिकारी एस. डी. येलकेवाड, नरेंद्र देशकर क्षेत्र सहायक विहिरगाव, सरपंच चनाखा रेखा आकनुरवार, उपसरपंच विकास देवाळकर, सरपंच विहीरगाव रामभाऊ देवईकर , उपसरपंच निलकंठ खेडेकर, माजी उपसरपंच इर्शाद भाई शेख, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, संतोष संगमवार, वनरक्षक जाधव, सुरवसे, हाके, पोले, चंदेल, शेंडे मेश्राम, गझलवार, जावळे, उरकुडे, राठोड यासह मौजा चनाखा, विहीरगाव, कोहपरा येथिल गावकरी, वनमजूर बहुसंख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *