आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते जिवती येथे ४. ९ कोटी च्या विकासकामांचे भूमिपूजन.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती (ता.प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिवती तालुक्यातील ४ कोटी ९ लाख रुपये मंजूर निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यात मौजा जिवती येथे सार्वजानिक बांधकाम उपविभाग कार्यालय बांधकाम करणे २१९ लक्ष, शासकीय विश्रामगृह ईमारत बांधकाम करणे १५० लक्ष, व्यायामशाळा बांधकाम करणे २० लक्ष, मौजा शेणगाव येथे महिला बचत भवन बांधकाम करणे २० लक्ष रुपये या विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जिवती सारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल क्षेत्राला आणि येथील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून होणाऱ्या नवीन निर्माण कार्यामुळे येथे विकासाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी नगराध्यक्षा कविता आडे, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार चिडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद गाडगे, उपजिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संजय बडकेलवार, कार्यकारी अभियंता एस. कुंभे, व्ही. ए. पोफळे, तालुकाध्यक्ष गणपत आडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष कैलाश राठोड, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा नांदा मुसणे, सुग्रीव गोतावळे, अशफाक शेख, गजानन आडे, वसंत राठोड, मारोती बेलजाडे, सुनील शेडकी, वजीर सय्यद, कांताताई क्षिरसागर, महादेव डोहिफोडे, अजगर आली, ताजुद्दी शेख, प्रलाद राठोड, प्रेम राठोड, मनीषा लांडगे ,संगीता येळमे , सारिका नंदेवार , वैशाली ब्राम्हणे, मनोज कींनाके, सुरेश खोब्रागडे , सुनील राठोड , गीतांजली रावनकोळे , भाग्यश्री जाधव , रेणुका बडगिरे , तुळसाबाई बडगिरे, भागरथा वारे, जनाबाई पवार, जिजा सावरगाव, द्वारका कोळगिर, संजवया शेबळे, तुळसाबई सूर्यवंशी, सुभद्रा गंगनर यासह स्थानिक नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *