गडचांदूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आखाडी एकादशी ला विठ्ठल नामाची शाळा भरली”

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:
आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा येथील चाळीस वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले असून गडचांदूर च्या विठ्ठल मंदिरात सुद्धा विठू नामाचा गजर करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सरुबाई गाडे यांनी सण 1984 मध्ये बांधलेल्या पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेला हरी भक्त पारायण दिपक महाराज पुरी, प्रफुल्ल उपाध्ये गुरुजी, अंबादास घोटकर, उद्धव पुरी, प्रा संगीता पुरी, बळवंतरावजी शिंगाडे यांच्या हस्ते महाभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी करत भगवान पांडुरंगाचे व रुख्मिनी मातेचे दर्शन घेतले.
दिवसभर पावसाची संततधार सुरू असतांनाही महिला पुरुष विठ्ठलाच्या नामघोषात मग्न दिसून आले.
महिलांनी भजन केले.” विठ्ठल नामाची शाला भरली” या भजनाने सर्वजण तल्लीन होऊन येथील विठ्ठल मंदिरात हरी नामाचा दिवसभर गजर करण्यात आला.जि प चे माजी सभापती अरुणभाऊ निमजे, नगरसेविका मीनाक्षी एकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व इतर भाविकांनी विठ्ठलच्या चरणी गडचांदूर वासीयांच्या सुख समृद्धी व उत्तम आरोग्यासाठीसाठी साकडे घातले . सायंकाळी धुपारती व हरिपाठ करण्यात आला.
मंदिर व्यवस्थापन तर्फे या वर्षी टिनाचे शेड उभारुन चांगली बैठक व्यवस्था करण्यात आली त्यामुळे भाविकांची चांगली सोय झाली.नगरपरिषद तर्फे भाविकांना बसण्यासाठी चार टेबल पुरविण्यात आले. मंदिर परिसरात सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर व जयघोष ऐकू येत होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *