कढोली खुर्द येथे शेतकरी संघटनेचे सुदामजी लांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील शेतकरी संघटनेचा गड मानल्या गेलेल्या कढोली खुर्द येथे सुदामजी लांडे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजुरा विधानसभा प्रभारी देवरावभाऊ भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते निलेश ताजने, तालुका अध्यक्ष नारायणजी हिवरकर, पुरुषोत्तमजी भोंगळे उपस्थित होते.
भाजपा प्रवेशित कार्यकर्त्यांना दुपट्टा देऊन देवरावभाऊ भोंगळे यांनी स्वागत केले. आपल्या प्रवेशाने भाजपाला बळ प्राप्त झाले असून आता आपण भाजपा परिवारातील सदस्य आहोत ही भूमिका जपावी. सर्वांची जबाबदारी वाढली असून प्रत्येक बूथ मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यामध्ये शेतकरी संघटनेचे सुदामजी लांडे यांच्यासह कढोली खुर्द येथील लक्ष्मण भोयर, मिथुन वडस्कर, दयाल बोढे, सोमेश्वर बोढे,चेतनतुराणकर, वसंता दोरखंडे, महेंद्र चोथले, शिवदास राजपंगे, हर्षल लांडे, महादेव शिडाम, योगेश लांडे, सोपान लांडे, पुरुषोत्तम वडस्कर, जगदीश जीवतोडे, दौलत उदे, दिनकर बोढे तसेच बोरी नवेगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कवडूजी बुटले, शामसुंदर सोयाम, शालेंद्र कारेकर, संदीप बुटले, आदित्य इटनकर यांचा समावेश होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *