महिला पोलिस कर्मचारी यांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलंबित पोलिस शिपायावर कार्यवाही करण्याचीची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*राधा पडवे नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर येथे कार्यरत आहे. लाल बिल्डिंग नंबर 5,क्वार्टर न.140 येथे राहतात. त्याच्या शेजारी निलंबित कर्मचारी संदीप पॊनिकर राहतो, त्याने सदर महिलेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले, त्यांनी दिले नाही त्यामुळे त्या संदिप पोनिकर यांनी 8/8/2022 च्या मध्यरात्री 2:30 वाजता राधा पडवे यांच्या क्वार्टर चे दरवाजा ठोकला आणि माझी आई आली का विचारणा केली, आणि लगेच लोखंडी रॉड आणून राधा पडवे याना डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राधा पडवे याचा मुलगा प्रणय मध्ये धावून आला तर त्याला सुद्धा मारण्यात आले आहे, दोघांना जबर मार लागलेला आहे, त्याचा उपचार विम्स हॉस्पिटल सदर नागपूर येथे चालू आहे.*
*संदिप पॊनिकर यांच्या विरोधात श्रीमती राधा पडवे यांच्या तक्रारीवरून एफ आर आय क्रमांक ३५७ अन्वये भादवि कलम४५२,३२४,३२३,२९४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना अरेस्ट करण्यात आले आहे.पोलीस अंमलदार राधा पडवे व जयराम रुचे यांनी पोलिस अंमलदार संदीप पोनीकर यांचे पोलिस क्वार्टर मधील गैरवर्तणूक बाबत यापूर्वी च मुख्यालय पोलिस निरीक्षक यांचेकडे तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली नसल्याने पौनीकर यांची हिंमत वाढुन त्यांनी जिवघेणा हमला केला. , संदीप पॊनिकर याला गंभीर शिस्तभंगाची कार्यवाही करावी तसेच महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा,पोलीस क्वार्टर मधील दारुड्या व गैरवर्तणूक करणारेवर कार्यवाही करावी आणि महिला पोलिस कर्मचारी चे सुरक्षेबाबत विषेश उपाय पोलिस आयुक्त यांनी करावे अशी मागणी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर , महाराष्ट्र राज्य कडून करण्यात आली आहे.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *