नेव्हल डॉकयार्ड को ऑपेरेटीव्ह बँक या बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनल विजयी.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3जुलै पगारदार कामगारांची असलेली नेव्हल डॉकयार्ड को ऑपेरेटीव्ह बँक. या बँकेच्या मुंबई मधील सर्वात मोठी बँक म्हणजे नेव्हल डॉकयार्ड को ऑपेरेटीव्ह बँक या बँकेच्या 2022-27 या पंचवार्षिक निवडणुकीत गेली 27 वर्षे बँकेवर संचालक /मानद सचिव पदाचा अनुभव असणारे नेव्हल एम्प्लॉयीस युनियनचे अध्यक्ष कॉम. पिताबस पानीग्रही यांच्या नेतृत्वाखाली NEU, BPMS व NCKS यांच्या महायुती पॅनलने INEU व ANTISA यांच्या पॅनल चा धुव्वा उडवीला आहे. 21 पैकी 19 जागांवर विजय मिळवून निर्विवाद सत्ता मिळविली आहे व बँकेवर आपले पुन्हा वर्चस्व ठेवले आहे. विरोधी पॅनल ला फक्त दोनच जागेवर समाधान मानावे लागले. या विजयासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *