जनता विद्यालय, बल्लारपूर येथील शिक्षक *श्री. विनायक नांदेकर यांना निरोप

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बल्लारपूर,

जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथिल शिक्षक
*श्री. विनायक देवाजी नांदेकर
हे अखंड 34 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा दिल्यानंतर दिनांक *30 जून 2022* ला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेतील हॉल मध्ये निरोप तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. के. लांडे मंचावर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री. जी. एच. खिरटकर , पाळी प्रमुख श्री. आर .आर. निखाडे , जेष्ठ शिक्षिका सौ. सी. व्ही. धकाते तसेच सत्कारमूर्ती श्री *. विनायक देवाजी नांदेकर, सौ. मंदाताई नांदेकर, डॉ. अंजली नांदेकर, कु. मंजुश्री नांदेकर* मंचावर उपस्थित होते.

श्री. आर. आर. निखाडे सर* यांनी प्रास्ताविक भाषणात श्री. विनायक देवाजी नांदेकर सर यांचा जीवन परिचय करून दिला.

त्यानंतर सत्कारमूर्ती श्री. विनायक देवाजी नांदेकर आणि सौ. मंदाताई नांदेकर यांचा सपत्नीक मुख्याध्यापक श्री. बि. के. लांडे , पर्यवेक्षक जि. एच. खिरटकर , पाळी प्रमुख आर. आर. निखाडे , ज्येष्ठ शिक्षिका सी. व्ही. धकाते मॅडम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तथा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर
पर्यवेक्षक जी. एच. खिरटकर
सी. व्ही. धकाते
डॉ. अंजली नांदेकर
पी. डब्ल्यू. मत्ते,
पी. एम. सातपुते
एम. एल. पानघाटे
पी. एम. उरकुंडे
यांनी श्री. विनायक देवाजी नांदेकर यांच्या जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर येथे 34 वर्ष अखंड सेवेदरम्यान केलेल्या कार्याचा उल्लेख, गौरव भाषणातून विशद केले.

यानंतर सत्कारमूर्ती विनायक नांदेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन बी. डब्ल्यू. बरडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पी. डब्ल्यू. मत्ते यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक-शिक्षकतेर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *