महात्मा गांधी विद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री कृषी क्रांती चे जनक स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, होते.
सर्वप्रथम अतिथीनि स्व,वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे यांनी माजी मुख्यमंत्री स्व,वसंतराव नाईक यांच्या जीवन चारित्र्य वर प्रकाश टाकला,कृषीp क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी ची माहिती दिली.
कार्यक्रम चे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन
प्रा बाळू उमरे यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *