विविध मागण्यांसाठी न.प गडचांदूरवर भाजपाचा धडक मोर्चा.!

लोकदर्शन 👉 मोहन भारती।                                              *⭕नगरसेवक अरविंद डोहे,आणि रामा मोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे.*

*गडचांदूर :-*
गडचांदूर नगरपरिषदेने शहरातील विविध विकास कामांना मजूरी दिली मात्र यातील काही कामे कित्येक दिवसांपासून खितपत पडले आहे.त्याच बरोबर या नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी येथील सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर वेठीस धरले असून जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे या मागणीसाठी उद्या 13 एप्रिल रोजी गडचांदूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक नगरपरिषदेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.”प्रभाग क्रं.2,दीनदयाल नगर येथील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी न.प .कडून मोजणीची रक्कम भरून 1वर्ष झाले मात्र अजूनही मोजणी झाली नाही ती तात्काळ करून अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयास पाठविण्यात यावा.थकबाकी मालमत्ता व पाणीपट्टी करावर लावण्यात आलेली 2 टक्के दंड(व्याज)रद्द करावा.प्रभाग क्रं.2 येथील विकास काम,नागरी दलित वस्ती फंडातून घेण्यात आले व संबधित विभागाच्या मंजुरीसाठी पाठविले,त्याला 1वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही मंजुरी नाही.त्या कामाचा पाठपुरावा करून विनाविलंब करावा.कित्येक महिन्यापासून बंद पडलेले येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज परिसर सौंदरीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे.स.न.336, 367/1ओपनस्पेसचे सौंदर्यीकरणचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करावी.मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांना दंड आकारून वसूल करावा.सम्राट नगर(होंडा शोरूम मागे)येथील रोड व नालीची कामे करण्यात यावी.राजीव गांधी चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा दुहेरी रस्त्याचे काम करावा.जोगी नगरातील नागरिकांनी दिलेल्या त्या निवेदनाची चौकशी करावी,तिथे विकास कामे करावी.स.न.104 मधील ओपनस्पेस मधील शिल्लक ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण करून उर्वरीत निधी ठरावात घेतलेल्या ओपनस्पेसवर खर्च करावी.मुसा ले-आऊट मधील बोअरवेल मंजूर होऊन दिड वर्ष झाले मात्र अजूनही बोअरवेल मारण्यात आली नाही.ती तात्काळ मारण्यात यावी.शेडमाके चौक ते रेल्वे गेटपर्यंत(दोन्ही बाजू)रोड साफ करून साचलेली माती काढावी व होत असलेले धूळ प्रदूषण बंद करावी.शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई व कचरा उचलण्यात यावा तसेच सरकारी शौचालयाची साफसफाई करावी.घनकचरा व्यवस्थापकाकडून नियम अटी-शर्तींनुसार काम मागील 1 वर्षापासून होत नसल्याने त्याच्या बिलात कपात करून बिल द्यावे.पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तिसरी अनुदान किस्तसाठी सभेला विषय घेऊन ठराव पारित करावा व शासनाकडे पाठपुरावा.वैशिष्ठपूर्ण योजनेतील 2,10 कोटींच्या कामांचे कार्यादेश व उदघाटन केले,बोर्ड लावले,परंतू 2 ते 3 महिने लोटून सुद्धा त्यातील अजूनही काही काम सुरू झाले नाही.ते तात्काळ सुरू करावी.” या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून याविषयी सकारात्मक भूमिका नाही घेतली तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व होणार्‍या परिणामास आपण जबाबर राहणार असा इशारा नगरपरिषदेला देण्यात आला आहे.
———–//——–
*नगरपरिषदेने घेतला मोर्चाचा धसका*
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित उद्याच्या मोर्चेचा नगरपरिषदेने धसका घेतला की काय,आज तडकाफडकी श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सौंदर्यीकरण कामाला सुरुवात करण्यात आली तसेच रस्त्यावर साफसफाई केली जात आहे.असे असताना इतर मागण्यांचे काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
———-//———

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *