भटाळी पायली गावाचे पुनर्वसन सर्व मुलभूत सुविधांसह आदर्श ठरावे* *- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिकडे केली मागणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*- ⭕तातडीने सर्व सुविधा पुरवाव्या*

*⭕पाणीपुरवठ्याचे थकीत विद्युत बिल* *वेकोलिने भरावे*

नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी माईन्सअंतर्गत भटाळी_पायली या गावाचा प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून, देशातील ‘आदर्श’ पुनर्वसित गाव म्हणून तेथील सर्वांगीण विकास करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांच्याकडे केली. मनोज कुमार यांनी दाखल घेवून संबंधिताना सूचना केली व समस्यांचे निराकरण होईल, असे आश्वासन दिले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात असलेल्या भटाळी गावालगत असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणींसंदर्भात वेकोलिच्या नागपूर येथील मुख्यालयात मंगळवार, १२ एप्रिल २०२२ रोजी आ. मुनगंटीवार यांनी व्यवस्थापकरीय संचालक व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वेकोलि, चंद्रपुरअंतर्गत भटाळी गावाजवळ कोळसा खाण आहे. गावातील जास्तीत जास्त जमीन वेकोलिने संपादीत केली आहे. या खदानीमुळे गावातील जलस्रोत कमी झाला आहे. त्यामुळे गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ब्लास्टिंगमुळे घरांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वेकोलिने तातडीने या गावाचे पुनर्वसन करून मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावि. भटाळी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या घरांचा वर्ष २०२१ च्या नमुना ८(अ)च्या रेकॉर्डनुसार सर्वेक्षण करून मोबदला द्यावा, पायली-भटाळी या दोन्ही गावांचे एकत्र पुनर्वसन करावे, प्रकल्पबाधित लोकांना दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात यावा, २़ लख लक्ष रुपये अनुदान देण्यात यावे. तेथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा योजनेचे थकित विद्युत बिल वेकोलिने अदा करावे. या समस्यांकडे आ. मुनगंटीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

वेकोलिने कोळसा खदानींच्या क्षेत्रातील गावांना पाणी, वीज आरोग्य आणि शिक्षण अशा मुलभूत सुविधा सीएसआरअंतर्गत पुरवाव्यात, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी काळजी घ्यावी, अशी सूचनादेखील आ. मुनगंटीवार यांनी केली. भटाळी हे पुनर्वसित गावं आदर्श ठरेल अशा पद्धतीने विकसित करावे, अशी ईच्छादेखील आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बैठकीला आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, चंद्रपुर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देवराव भोगळे, उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक राहुल घोटेकर, अजय दुबे, प्रमोद शिरसागर, पायली-भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश गौरकार, सुभाष गौरकार यांच्यासह वेकोलिचे अधिकारी एस.के.गोसावी, अजय वर्मा आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *