*भाजपाच्या दणक्याने घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्याच्या डागडूज्जीचे काम सुरु*

 

लोलदर्शन👉शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील राजीव रतन चौक ते म्हातारदेवी रस्त्याच्या डागडुज्जीचे काम भाजपाच्या दणक्याने सुरु झाले आहे. मागील अनेक दिवसापासून या रस्त्याची दयनीय अवस्था होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहात होते त्यामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला होता. घुग्घुस ते म्हातारदेवी रस्ता खराब झाल्याने अनेक दुचाकी धारक खड्ड्यात पडून जखमी झाले. दररोज या मार्गाने दुचाकी, चारचाकी, ऑटो, स्कुलबस, कोळश्याची जडवाहने ये-जा करतात ये-जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

त्याअनुषंगाने गुरुवारी, 30 जून रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपाच्या शिष्टमंडळाने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रकाश अमरशेट्टीवार, रवींद्र ढोरे यांनी रस्त्याची पाहाणी केली व संबंधित कंत्राटदाराच्या व्यवस्थापनाला भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली. याची दाखल घेत शुक्रवारी 1 जुलै रोजी सकाळ पासून जेसीबी मशीनने रस्त्याच्या डागदुज्जीचे काम सुरु करण्यात आले आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, अनंता बहादे, राजेश मोरपाका, मानस सिंग, गणेश खुटेमाटे, राजू डाकूर, मधुकर धांडे, हेमंत कुमार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *