यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी।     

. लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर —सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी उपपंतप्रधान व माजीसंरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती 12 मार्चला साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे होते . त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली. तसेच वीर बाबुराव शेडमाके व यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा परिचय करून देताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या योगदान विषयीची सोदाहरण माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य नेत्रदीपक आहेत याची जाणीव करून दिली. तसेच वीर बाबुराव शेडमाके यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेले आदिवासीचे संघटन व दिलेला लढा याचीही माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे प्रा. मेहरकुरे, प्रा. गुजर ,नामदेव बावनकर, राजेश मांढरे, सुरेश पाटील ,जी. एन.बोबडे, कु. ज्योती चटप कु.माधुरी उंबरे कु.भुवनेश्वरी गोपंमवार,जीवन आडे, सिताराम आत्राम ,भालचंद्र कोंगरे, राजेश वासेकर,घाटे सर, यांचेसह शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तथा आभार ज्येष्ठ शिक्षण महेंद्रकुमार ताकसांडे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *