लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी
वालुर येथून जवळच असलेल्या भांगापुर येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राहुल सपाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अक्षय सुंदर गजानन कटारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुषपहार अरपण करण्यात आला. यावेळी गजानन कटारे,अक्षय सुंदर यांनी महात्मा फुले यांनी महात्मा फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष राहुल सपाटे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.यावेळी बहुसंख्येने नागरिका़ंची उपस्थिती होती.