आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते १ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या १ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा सिद्धेश्वर येथे श्री रमेश दयालवार ते बालाजी यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे किंमत 20 लक्ष, मौजा देवाळा येथे सिरपती केंद्र 23 किव्हीं पावर हाऊस कडे जाणारा मार्गाचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे, मौजा देवळा येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे, ग्रामपंचायत लक्कडकोट अंतर्गत मौजा रेड्डीगुडा येथील अनिल कोटावार यांचे दुकान ते चंद्रया यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामपंचायत कोष्टाळा येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, माजी सभापती हमीदभाई, राधेश्‍याम कुमार, शंकर बोंकुर, अब्दुल जावेद, राजेंद्र जाधव, रामचंद्र जाभोर, पूर्णचंद्राराव पेद्दी, कुंदाबाई लोखंडे, गोपाल कुंदाराम, नामदेव भुजाडे, गौसला आजमजणी, दिनकर एकोणकर यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *