साहेब आमची समस्या दूर करा हो’ विद्यमान आमदाराकडे नागरिकांनी केली मागणी

By : Mohan Bharti

गडचांदूर:येथील प्रभाग क्रमांक १ मधील जीवघेण्या 33000 हाय व्होल्टेज विद्युत तारांना त्वरित स्थानांतरित करण्याची मागणीला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याकरिता प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी
राजुरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुभाष भाऊ धोटे यांची भेट घेऊन ‘ साहेब, आमची समस्या दूर करा हो’
अशी विनंती केली आहे.
गडचांदुर शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून जाणाऱ्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा अनेक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या या विद्युत तारा बऱ्याच लोकांच्या घरावरून गेलेल्या आहेत तर काही लोकांच्या प्रत्यक्ष घराच्या आत या हाय व्होल्टेज तारांचे विद्युत खांब स्थापित आहेत. ह्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. छतावरून अगदी हात पुरेल एवढ्या अंतरावर असलेल्या या विद्युत तारांमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी एकटे सोडणे दुभर झाले आहे. सदर हाय व्होल्टेज तारांना नकळत स्पर्श होऊन बऱ्याच लोकांना आपले जिवन गमवावे लागले आहेत तर बऱ्याचश्या लोकांची वित्त हानी झालेली आहे.
मागील डिसेंबर महिन्यात पेंटिंग चे काम करत असलेल्या अवी पोचू रामटेके ह्या गरीब कुटुंबातील व्यक्तीचा हाय व्होल्टेज विद्युत तारांचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला. तर आठ महिन्यांची गर्भवती पल्लवी शुभम पेंढारकर ह्या महिलेला शॉक लागल्यामुळे आपला हात गमवावा लागला, एकदा नव्हे तर दोन वेळा सदर महिलेला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
तसेच या पूर्वीसुद्धा अपघाताच्या बऱ्याचश्या घटना घडून आलेल्या आहेत.
राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांमुळे प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला असून या प्रभागातील लोकांची समस्या
लक्षात घेऊन प्रभागात राहणाऱ्या प्रा. जहीर सैय्यद, प्रविण मेश्राम, सतिश भोजेकर, रतन मुन, विनोद हरणे इत्यादी नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.म गडचांदुर यांना या आधीच निवेदन सादर करुन सदर हाय व्होल्टेज विद्युत तारांना त्वरित स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे हे विशेष

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *