अखेर प्रशासनाच्या अश्वासनाने भाजपाचे उपोषण मागे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गडचांदूर – गडचांदूर नगर परिषदनी मालमत्ता व पाणी पट्टी कर वर 2 % शास्ती (दंड) लावण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान राशी तात्काळ देण्यात यावी या मागण्या घेऊन दिनांक 19/5/2022 पासून भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात भाजपा दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्रशांत खाडे व शक्तिकेंद्र प्रमुख बबलू रासेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले.आज सहावा दिवस असून शेवटी नगर परिषद च्या प्रशासनाने नम्रता घेत यांच्या दोन्ही मागण्या मंजूर करीत असल्याचे लेखी पत्र दिले.सदरचे पत्र दिल्यावरून आज सायंकाळी ठीक 6.00 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष मा देवराव भाऊ भोंगळे माजी आमदार संजयभाऊ धोटे,माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर यांचे हस्ते उपोषण कर्ते प्रशांत खाडे व बबलू रासेकर यांनी निंबू पाणी पाजून उपोषण सोडले.यावेळी सर्व उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी यांनी व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यानी तसेच शहरातील नागरिकांनी उपोषण कर्ते यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मा देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार संजयभाऊ धोटे,माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर ,भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, निलेश ताजने,महेश शर्मा,सुरेशजी केंद्रे,केशव गिरमाजी,महेश देवकते,हरीश घोरे, संदीप शेरकी,गणपत बुरटकर, राकेश अरोरा, अशोक दरेकर, दीपक गुरनुले,प्रशांत खाडे,बबलू रासेकर,प्रतीक सदनपवार,मेहताब सर,अजीम बेग,इम्रान पाशा,सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ रंजनाताई मडावी,सौ विना खंडाळकर,सत्यदेव शर्मा ,तुषार देवकर,गंगाधर खंडाळे ,हफिज भाई,महेश घरोटे,आदींची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *