अखेर संशोधकांचा मार्ग मोकळा.. आता नोंदणी नंतर कोर्सवर्क.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या प्रयत्नांना भरीव यश.

राजुरा :– गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील संशोधकांना पी.एचडी संशोधनात अडचणीचे ठरणारे जाचक परिपत्रक रद्द झाले असून आता जुन्या प्रचलित नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतरच त्यांना कोर्सवर्क करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. यासंदर्भात आजच विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे यासंदर्भात गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन ने अनेकदा या संदर्भात निवेदन देऊन नोंदणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जुन्या प्रचलित नियमाप्रमाणे कोर्सवर्क करू देण्याची व संशोधन करू देण्याची सातत्याने मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेमध्ये संघटनेचे अध्यक्ष व विद्या परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी हा मुद्दा लावून धरला तसेच बाब क्रमांक13 मध्ये त्यांनी आपला प्रश्न सादर करून सभागृहात आपली भूमिका सक्षमपणे पटवून दिलीहोती.
पेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या इच्छुक संशोधकांना प्रथम गाइड ची निवड करता यावी व त्यांचे मार्गदर्शन मिळावे व त्यांची नोंदणी होऊन रीतसर त्यांना कोर्सवर्क करता यावे यासंदर्भात डॉ. गोरे यांनी विद्या परिषदेत आपली भूमिका पटवून दिली होती यावेळी त्यांच्या भूमिकेला उपस्थित सर्व विद्या परिषद सदस्यांनी अनुमोदन व समर्थन दिले होते. यावेळी माननीय कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी सदर भूमिका मान्य केली होती. त्यामुळे संशोधकांना जाचक करणारे परिपत्रक रद्द झाले असून संशोधक विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच गोंडवाना यंग टीचर संघटनेच्या कार्याचे हे मोठे यश मानले जात आहे.
अनेक दिवसापासून संशोधक व मार्गदर्शक संभ्रमात होते . संशोधन करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील परिपत्रकातील अट रद्द झाल्याने व आता जुन्या प्रचलित नियमाप्रमाणे संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली असल्याने यासंदर्भात संशोधक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन ने माननीय कुलगुरू प्र-कुलगुरू, कुलसचिव या सर्व विद्यापीठीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *