

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर ,,,
समाजाचे दातृत्व स्वीकारून ,कुटूंबापासून पोरके झालेल्या वयोवृद्धांना ,स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मायेचा ओलावा देण्याचा प्रयत्न सेवानिवृत्त शिक्षिका सौ .आशा तुळशीराम पुंजेकर यांनी करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे .
गडचांदूर येथील सौ .आशा तुळशीराम पुंजेकर यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर वास्तव्यास असणाऱ्या वयोवृद्धा सोबत आपला वाढदिवस साजरा करून वयोवृद्धांना अन्नदान ,फळे ,स्वेटर ब्लँकेटचे वितरण करून त्यांचा आशीर्वाद घेतला .त्यांच्या आदर्श कार्यासाठी पती तुळशीराम पुंजेकर ,मुलगा प्रसाद पुंजेकर व स्वाती पुंजेकर या नवदाम्पत्याने मोलाची साथ दिली .तर संकेत भोयर ,जयश्री भोयर यांनी सहकार्य केले .