गडचांदूर नगर परिषदेच्या महिला नगरसेविका नी केला अभ्यास दौरा

,,वणी शहरातील विविध विकास कामांची केली पाहणी

दी.13/03/2021 मोहन भारती
गडचांदूर,,(ता,प्र,) महाशिवरात्री च्या पावन पर्वावर गुरुवारी गडचांदूर नगरपरिषदेच्या महिला नगरसेविकानी वणी शहराचा अभ्यास दौरा केला,
गडचांदूर नगरपरिषदेची दुसरी निवडणूक होवून 1 वर्ष झाले आहै परंतू मागील 2020 हे वर्ष कोरोनात गेले त्यामुळे शहरातील विकासकामे खोळंबली ,गडचांदूर शहराचे सौंदरीकरण व्हावे, इतर विकासकामे व्हावीत, व आपले शहर इतर शहरासारखे स्वच्छ सुंदर दिसावे या साठी वचनबद्ध असलेल्या नगराध्यक्ष सौ सविताताई टेकाम यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेविकानी वणी शहरातील घनकचरा प्रकल्प, वैकुंठ स्मशानभूमी,बगीचा,विविध चौकातील सौंदरिकरण व इतर विकासकामांना भेट दिली तसेच नगरपरिषद प्रशासकीय भवनाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली
सदर अभ्यास दौरा मध्ये वणी नगरपालिका चे नगराध्यक्ष .श्री तारेंद्र बोर्डे व मुख्याधिकारी श्री संदीप माकोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, सदर अभ्यास दौरामध्ये गडचांदूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष .सौ सविताताई टेकाम, मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी,बांधकाम सभापती तथा गटनेता सौ कल्पना ताई निमजे, महिला बालकल्याण सभापती सौ अर्चना वांढरे,उपसभापती सौ वैशाली गोरे, माजी सभापती सौ जयश्री ताकसांडे,सौ मिनाक्षी एकरे, सौ सुनीता ताई कोडापे, सौ अश्विनी कांबळे, सौ किरणताई अहिरकर, सौ राजिया शेखख्वाजा व बांधकाम अभियंता अनुप भगत व लिपिक संतोष गोरे यांनी सहभाग घेतला. सदर अभ्यासदौऱ्यात सर्व पक्षीय महिला नगरसेवि कांचा सहभाग होता हे विशेष.
अभ्यासदौऱ्याला वणी नगरपालिके च्या बांधकाम अभियंता रोशनी नाईक व लिपिक अभि गायकवाड यांनी सहकार्य केले,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *