

By : Mahesh Giri
ओबीसी कल्याण मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी व्हीजेएनटी समन्वयसमिती च्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी आरक्षण विधेयकावर सही केल्याबद्दल मा. राज्यपाल महोदयांचे आभार व्यक्त केले. महा विकास आघाडीने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण( 50% च्या आत) देण्यासाठी मागील संपन्न झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात दोन्ही सभागृह विधेयक मंजूर केले होते. सदर विधेयक सहीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आले होते. काल दिनांक 1/2/2022 रोजी राज्यपाल महोदयांनी सदर विधेयकावर सही केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यासाठी माननीय नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वात ओबीसींच्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे शिष्टमंडळ आज दिनांक 2/2/ 2022 रोजी माननीय राज्यपाल महोदयांना भेटले व त्यांचे आभार व अभिनंदन केले या शिष्टमंडळांमध्ये माननीय नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांच्याबरोबर डॉ. श्री बबनराव तायवाडे- अध्यक्ष- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, प्रा. सुशिला मोराळे – समन्वयक ओबीसी व्हीजेएनटी समन्वय समिती, अड. पुरुषोत्तम पाटील- अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , प्रा. लक्ष्मण हाके – सदस्य राज्य मागासवर्ग आयोग, प्रा.धनाजी ओंबासे – अध्यक्ष भटके विमुक्त हक्क परिषद ,श्रीमती साधनाताई राठोड- समन्वयक ओबीसी व्हीजे एनटी समन्वय समिती, श्री प्रतिक गोसावी- युवाअध्यक्ष- भटके-विमुक्त हक्क परिषद आदी मान्यवर उपस्थित होते- प्राध्यापक सखाराम धुमाळ