• *घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात चंद्रपुर जिल्हास्तरीय “ मन कि बात “ कार्यक्रम संपन्न*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

•⭕ *मन कि बात कार्यक्रमास देशाच्या 130 करोड जनतेचा उत्तम प्रतिसाद- देवराव भोंगळे*

• ★*चंद्रपुर जिल्ह्यात ५२० बुथवर हजारो नागरिकांनी पाहिला मन की बात कार्यक्रम*

रविवार 30 जानेवारी रोजी सकाळी *घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात* देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शन वरून प्रसारित होणाऱ्या मन कि बात च्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन *भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात* करण्यात आले होते. याप्रसंगी मोठया संख्येत उपस्थित माजी सैनिक, जेष्ठ नागरिक व आशा वर्कर तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी मन कि बात द्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकले तसेच राष्ट्रपित महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मन की बात चे जिल्हा संयोजक तथा भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जिप सदस्य संजय गजपुरे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मन कि बात कार्यक्रमाचे संयोजक संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहरात एकूण 18 बूथवर मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात संतोष नुने, निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, नितु चौधरी, बबलू सातपुते मल्लेश बल्ला, राजेश मोरपाका, तुलसीदास ढवस, दिलीप कांबळे, निरंजन डंभारे यांनी मन कि बात कार्यक्रम 18 बूथवर घेण्यासाठी प्रयत्न केले. 3 ऑक्टोबर 2014 पासून मन कि बात कार्यक्रमाची सुरवात झाली आज त्याचा 85 वा भाग आहे. देशात विविध गोष्टी घडत असतात त्या आपल्या पर्यंत पोहचत नाही.
अनेक कर्तृत्ववान व्यक्तीचे कर्तृत्व टेलिव्हिजन च्या माध्यमातून सुद्धा समाजा पर्यंत पोहचत नाही.अनेकांनी स्वतःचे जीवन लोकसेवे साठी समर्पित केले त्त्याचे दर्शन मन कि बातच्या कार्यक्रमातून होते. मन कि बात च्या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम घेऊन केली याला देशातील 130 करोड जनतेने प्रतिसाद दिला.
प्रस्तावना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली तर प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे व जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन साजन गोहने यांनी केले. आभार प्रदर्शन मन कि बात कार्यक्रमाचे संयोजक संजय तिवारी यांनी केले.
कार्यक्रमात सेवा निवृत्त सैनिक, जेष्ठ नागरिक यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह तसेच कोविड योद्ध्या म्हणून आशा वर्कर्सना फेसशिल्ड देऊन सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जिप सभापती नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नेश सिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, भाजपाचे विनोद चौधरी संजय भोंगळे, जेष्ठ नागरिक संघाचे नीलकंठ नांदे, सोमाजी भुते, डोमाजी वानखेडे, माजी सैनिक रामदयाल चव्हाण, संदीप बांदूरकर, नितीन मांदाडे, विशाल बोरीकर, संभाशिव देवतळे, नरेंद्र बांदूरकर, नंदू ठेंगणे, विठ्ठल बोबडे, किशोरी प्रसाद, मधुकर धांडे अमोल थेरे, नितीन काळे, अर्चना लेंडे, सुशील डांगे, बालाजी धोबे, मानस सिंग, निरंजन नगराळे, निलेश भोंगळे, अरुण साठे, आशा वर्कर छाया चौधरी, ज्योती पाटील, प्रतिभा चौधरी, संगीता कासवटे, वैशाली बोबडे, आरती पुसाटे, अर्चना ठमके, छाया पाटील, कल्पना डांगे, शरद गेडाम, ज्योती मुन, सतीश कामतवार, वसंता भोंगळे, उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *