सावित्रीबाई फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल व शरदराव पवार महाविद्यालय गडचांदुर , येथे गणराज्य दिन साजरा।                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल व शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष तू.ता.पंजेकर, सहसचिव विनायकराव उरकुडे, सदस्य माधवराव मंदे, सदस्या श्रीमती नलिनी ताई डोहे, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंग, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या खोडके मॅडम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणा पूर्वी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन श्री बावनकर यांच्यासह सर्व उपस्थित कर्मचारी वृंद व मान्यवरांनी केले. कार्यक्रमाकरिता तीनही विभागातील शिक्षक, प्राध्यापक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पर्यवेक्षक संजय गाडगे, वासेकर , घाटे , सिताराम पिंपळशेंडे ,संकल्प भसारकर , यांनी विशेष सहकार्य केले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *