आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्थेच्या सदस्यांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गोंडपिपरी :– आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था करंजी करंजी र.न. ५०२ तह गोंडपिपरी संस्थेचे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यात संस्थेचे सदस्य गजानन कवडू सोयाम, अंबादास गंगाराम शेडमाके, प्रमोद सोमा टेकाम, विजय विठ्ठल तेल्कापल्लीवार, हरिश्चंद्र सिताराम चापले, विमाल मारुती आलाम, कमल भास्कर कोवे हे लोकमत सहकार पॅनल काँग्रेस पक्ष समर्थकचे विजयी नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार आज करण्यात आले.
या प्रसंगी तुकेश वानोडे, आशिष निमगडे, सुरेश भासारकर, चरणदास मानडोळे, निलेश देवगडे, नितीन चापले, अशोक गुंटीवार, नितेश वानोडे, बंडू तेल्कापल्लीवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here