महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे कोवीड लसिकरण

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे दि.१८/०१/२०२२ ला १५ ते१८ वयोगटातील वर्ग ११ वी व वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांना कोवीड लसिकरण करण्यात आले.या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी .डाँ स्वप्निल टेंभे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व लसिकरणाविषयी माहिती देऊन लसिकरणाला सुरूवात केली.आरोग्य विभाग नारंडाच्या आरोग्य सेविका प्रतिभा जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना लसिकरण केले.सोबत आरोग्य सेवक आर.एन.राठोड,शितल चूनारकर, रेखा वासाडे,काटकर मॕडम,ताकसांडे मॕडम यांनी सहकार्य केले.यावेळी प्राचार्य शरद जोगी,तंत्र स्नेही संदिप मोहूर्ले, प्रा.साईनाथ कुंभारे,प्रा.पत्रकार,प्रा.कु.तामगाडगे, पद्माकर खैरे,दत्ता येडमे ,रामकृष्ण परसूटकर,कु.सलमाबी कूरेशी,प्रभाकर काकडे,मधूकर काकडे उपस्थित राहून सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *