मुलभूत आणि शाश्वत विकासासाठी फक्त काँग्रेसला साथ द्या

* लोकदर्शन 👉 लोकदर्शन


⭕ – खासदार बाळुभाऊ धानोरकर.

⭕*गोंडपिपरीत ६.५ कोटींच्या रस्ते विकासकामांना शुभारंभ*

*⭕खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले भुमीपुजन.*

गोंडपिपरी :– लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील प्रजिमा- २४ ते प्रजिमा-५४ चेक लिखीतवाडा रस्ता २ कोटी ९५ लक्ष, राष्ट्रीय महामार्ग ३५३- बी करंजी ते खराळपेठ रस्ता, ३ कोटी ६४ लक्ष असे एकुण ६ कोटी ५० लक्ष रुपये निधी च्या रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण विकासकामांचे भूमिपूजन खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, देशात, राज्यात आणि आपल्या परिसरात मुलभूत आणि शाश्वत विकास घडवून आणायचा असेल तर जनतेने नेहमी काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे. कारण काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यानंतर अतिशय बिकट परिस्थितीत सुध्दा न डगमगता देशात अनेक मुलभूत व शाश्वत विकासकामे पूर्ण केली आहेत. आपल्या भागातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे आणि मी विशेषत्वाने प्रयत्नशील असून आपल्या भागात कशाचीही कमी पडू देणार नाही. तर आमदार सुभाष धोटे म्हणाले की, क्रियाशील लोकप्रतिनिधी हे नेहमीच आपल्या गाव, शहर, क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असतात. ते सातत्याने संघर्ष करुन विविध विकासकामे पूर्ण करतात. आपल्या भागातील अनेक सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे, खासदार साहेबांकडे पाठपुरावा केला, त्यातून येथे अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. येणाऱ्या काळात आनखी सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, सं गां नि योजना अध्यक्ष विनोद नागपुरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, अनु जाती/अनु जमाती तालुकाध्यक्ष गौतम झाडे, महिंद्र कुनघाडकर, बालाजी चेनकापुरे, माजी सरपंच ऋषी डोडरे, लिखितवाडा चे सरपंच भाग्यश्री आदे, उपसरपंच हरिश्चंद्र मडावी, पुष्पा राऊत, प्रतिभा चंद्रगिरीवार, माया कोहपरे, कोमल फरकडे, प्रभाकर कोहपरे, खरडपेठ चे सरपंच राऊत, अभय शेंडे, सचिन फुलझले, शांताराम शेंडे, संदीप राऊत, बबलू कुडमेथे, शिनु कंदनूरीवार यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *