ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकार खात असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद

By : Mohan Bharti

पर्यटकांना मिळाले वाघोबाचें मनसोक्त दर्शन

गडचांदुर : भारतात वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगरझरी बफर झोन मध्ये सफारी करीत असणारे पर्यटक मंत्रमुग्ध झाले असून वाघोबाचें मनसोक्त दर्शन मिळालें.
वाढत्या ओमीक्रोन व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शासनाने अनेक निर्बध लादले आहे त्यात राष्ट्रीय उद्यान असलेल्या ताडोबात सुद्धा जंगल सफारी चा कालचा शेवटचा दिवस असल्यानें अनेक पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला त्यात बफर झोन असेलेल्या आगरझरी प्रवेशव्दारात सफारीला असलेल्या पर्यटकांना छोटी मधू (T-52) व तिच्या 3 बछडयानी दर्शन दिले असून शेवटच्या दिवशी पर्यटक मंत्रमुग्ध झाले.

वाघोबाच्या दर्शनाकरिता संपूर्ण देशभरातून पर्यटक ताडोबा जंगल सफारीकरिता येतात रिसर्स,फोटोग्राफी करीत येतात आणि शिकार खाताना मिळणारा अनुभव हा प्रत्येक वेळी भेटणार नाही

गडचांदूरचे पर्यटकांनी जंगल सफारीसाठी मोहर्ली भागातल्या आगरझरी बफर प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला होता. सफारीदरम्यान त्यांना ‘छोटी मधू’व वाघिणीनं दर्शन दिलं. वाघिणी सोबत तिचे पिल्ले देखील होते,सफारी दरम्यान शिकार खात असतानाचे दृश्य वन्यजीवछायाचित्रकार प्रिंतेष मत्ते यांनी टिपले आहे

पर्यटक आकर्षित
यावेळी पर्यटकांनी ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकारही पाहिलीय. सफारीच्या दरम्यान छोटी मधू’ सांबर डियर,वन्यजीवाची शिकार केली. त्यानंतर दमदार पावलं टाकत जिप्सीच्या दिशेनं आली. छोटी मधूने बछड्यासह पर्यावरणप्रेमी दीपक खेकारे, अमोल मेश्राम ,प्रितेष मत्ते व इतर पर्यटकांना दर्शन दिले . ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीव श्रीमंतीची पर्यटकांनी मुक्तकंठानं प्रशंसा केलीय.ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातल्या चंद्रपूर जिल्ह्यातला एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. हे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे सध्या कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे काही काळ ते बंद होणार असल्याची शक्यता आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *