महात्मा गांधी विद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच, बी, मस्की,शोभा जीवतोडे,एम,सी,व्ही, सी,विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, उपस्थित होते, सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आजच्या युवा पिढीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्या स्मिता चिताडे यांनी व्यक्त केले, प्रास्तविक उपप्राचार्य विजय आकनूरवार,यांनी केले, संचालन प्रा, सागर नागपुरे यांनी केले, तर आभार विनोद भोगेकर यांनी मानले,कार्यक्रमाला दिन विशेष समितीचे सदस्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *