![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
लोकदर्शन 👉 मोहन भारती
,⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री नारायण हिवरकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,,
कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री जयपाल राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री नारायण हिवरकर (भाजपा तालुका अध्यक्ष) श्री किशोर मालेकर,जिवतोडे डोहे ,श्री तेलंग ,सौ मडावी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते बैठक जयपाल राऊत मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात एक मताने श्री नारायण हिवरकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी सौ शारदाताई मेश्राम यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून श्री बंडू भाऊ कुरसंगे,श्री गणेश मालेकर,सौ प्रतिभा ताई पडोळे, श्री किशोर जेणेकर,सौ मनिषा ताई भोयर,सौ संगिताताई चौधरी,सौ सविता ताई वाघाडे,सौ किरण ताई येरेकर, श्री सोनेराव सोयाम यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात मी यापूर्वी सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीत होतो चांगल्या प्रकारे कार्य केले यानंतरसुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या विकासाच्या कामात सहभागी राहून शाळेला सर्वतोपरी माझे सहकार्य राहील माझी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल सर्व पालक वर्गाचे महिला पुरुष व मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्गाचे व नागरिकांचे आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला पालक,कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डोहे यांनी केले तर आभार जिवतोडे यांनी मानले