” वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात कोविड लसिकरण “

लोकदर्शन वालुर /प्रतिनिधी 👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात कोविड लसिकरण दि.10 जानेवारी सोमवार रोजी राबविण्यात आले. शासनाच्या वतीने 15 ते 20 वयोगटातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांचे लसीकरण करण्याची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार वालुर येथील वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात दि.10 जानेवारी सोमवार रोजी लसीकरण घेण्यात आले .यावेळी विद्यालयातील एकुण 60 विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधी कोव्हँकसिन लस देण्यात आली. या वेळी वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे, बि .व्हि .बुधवंत, एम.एस.गिरी,डि.आर.नाईकनवरे, जि.एम. कावळे केंद्र प्रमुख राम मैफळ आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी सि. एच.ओ.डॉ. सिद्धिक सर,सेवक आर.पि.गोरे, आरोग्य सेविका फुलारी मँडम, आरोग्य सेवक मोटे आदिंनी लसीकरण केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *