

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– आदिवासी उपयोजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा भुरकुंडा (खुर्द) ते भेंडवी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजित किंमत ७० लक्ष रुपये आणि खनिज विकास निधी अंतर्गत जिवती तालुक्यातील ग्रामपंचयत आसापुर अंतर्गत लिंगणडोह येथे वाचनालय बांधकाम करणे २० लक्ष रुपये निधी या विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लिंगणडोह येथे आमदार सुभाष धोटे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन सुरेश राठोड, दिंगबर राठोड, नीलकंठ राठोड, मारोती राठोड, अंकुश राठोड, विनोद राठोड, गजानन राठोड यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जिवती तालुकाध्यक्ष गणपत आडे, पं.स. सभापती अंजना पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अरुण निमजे, भूरकुंडाचे माजी सरपंच नामदेव कुमरे, पाचगावचे माजी सरपंच शंकर गोनेलवार, माजी जि प सदस्य नानाजी आदे, आदिवासी नेते शामराव कोटनाके, जंगु पा. येडमे, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, गोरखनाथ जाधव, लिगुजी कुमरे, उमेश गोनेलवार, उत्तम पवार, आनंदराव जाधव, भिमराव पवार, तुकाराम जाधव, सुरेश राठोड, नानाजी पुसाम, दौलत करपते यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.