संघटना ही एकतेच प्रतीक :- सोपान नागरगोंजे।।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕,,,,,,,,,,,
सत्यसेवा सामाजिक संघटना पिंपळगाव चा शुभारंभ.
,,,,,,,,,

गडचांदूर,,,,,

मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो समाजात आपले वास्तव्य करते. त्याचबरोबर आपण समजा एक अंग असल्याने समजला काही देणं लागते. याच दृष्टीने आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे तसेच संघटन हे सुध्दा गावातीलच महत्वाचा घटक आहे. मानवीय संघटन चांगले असेल तर त्याला हलविण्याची मजाल होणार नाही. यामुळेच संघटन हे एकतेचे प्रतीक म्हणून सुध्दा ओळखल्या जाते. समाज गाव एक असला की कोणताही काम सहज रित्या होत असते असे प्रतिपादन त्यांनी पिंपळगाव येथील युवकांचा सत्यसेवा सामाजिक संघटना स्थापन केली कार्यक्रमा प्रसंगी केले.

पिंपळगाव यथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव येथील युवकांनी सत्यसेवा सामाजिक संघटना स्थापना कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. गिरीधर काळे उदघाटक म्हणून सोपान नागरगोजे व प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वर बोन्डे गावातील प्रतिष्टीत नागरिक होते.

सदर कार्यक्रमा प्रसंगी गावातील सामाजिक राजकीय शेती आरोग्य शिक्षण इत्यादी क्षेत्रात कामगिरी करनार्यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार कारण्यात आला.

संचालन मंगेश बोधाले यांनी केले प्रास्ताविक प्रशांत नागपूरे तर आभार महादेव बोभाटे यांनी केले.त्यानंतर समजप्रबोधक सप्तखंजरी वादक उदयपाल महाराज यांचा कीर्तनचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी राजेंद्र भोयर प्रदीप कष्टी कैलाश भोयर शेखर देशमुख आकाश चुधरी बंडू बोढाले आनंद लोडे प्रवीण पानघाटे विशाल वाढई प्रवीण जोगी विजय गोहणे अमित बोबडे विलास ठाकरे विलास पिदूरकर सुरज गेडाम मुकेश गाणफाडे सचिन डवरे यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *