जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे मासीक पाळी व्यवस्थापन उद्बोधन कार्यक्रम

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी पंचायत समिती कोरपना येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा लेकींचा” या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी “मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र 4 जानेवारी ला आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.
पेंदोर , होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सौ. सविता बोबडे जेनेकर मॅडम तालुका प्रवर्तक कोरपना ( सुपरवायझर आशा वर्कर ), उज्ज्वला मून (आशा वर्कर बाखर्डी), तसेच सहायक शिक्षिका कु सुप्रिया कोंगरे मॅडम उपस्थित होत्या
मार्गदर्शक महोदयांनी किशोरवयीन मुलींना वरील विषयाबद्दल उत्कृष्ठ मार्गदर्शन केले, व त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले नंतर मुख्याध्यापक पेंदोर यांनी शाळेच्या वतीने एक छोटी भेट प्रदान करून सविता बोबडे जेनेकर मॅडम व सौ . उज्ज्वला मून यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक श्री. स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक प्रफुल्ल जीवने यांनी केले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *