शासन मान्य ताडी (शिंदी) विरोधात २८८ आमदारांना निवेदन देणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २५/१२/२०२१ :-* महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाचे महाराष्ट्रात ताडी (शिंदी) दुकाने प्रशासन विभागाने जारी केले आहे शासन मान्य ताडी (शिदी) दूकाने म्हणजे मौतका कूवा आहे . म्हणून ताडी ( शिंदी ) दूकाना विरुध्द महाराष्ट्र कामगार सेना व शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकान विरोधी संघर्ष समीतीच्या वतीने दि २७/२८ डिसेंबर २०२१ रोजी विधान सभेचे २८८ आमदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे माहीती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शासन मान्य ताड़ी ( शिंदी ) दूकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपूरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
सोलापूर सह महाराष्ट्रात ताडी ( शिंदी) कुठल्याही प्रकारचे मागणी नसताना केवळ आर्थिक लाभासाठी व काही दोन नंबर धंदेवाल्यांच्या हितासाठी बंद पडलेले ताडी ( शिंदी ) दूकाने शासनाला अंधारात ठेवून प्रशासन ताडी ( शिंदी ) चालू करण्याच्या निर्णय घेतला आहे . याविरुध्द कामगार सेना व संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे . त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून दि २७ डिसेंबर २०२१ रोजी विधानसभेच्या २८८ आमदारांना निवेदन देण्यासाठी उद्या दि २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वा विष्णु कारमपूरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली सोहेल शेख , गणेश बोड्डू . व प्रसाद जगताप व विठ्ठल कुऱ्हाडकर आदि सह पद्मशाली चौक *(कामगार सेना कार्यालय)* येथून मुंबई रवाना होत आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *