काँग्रेस सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे – डॉ. नितीन राऊत

By : shankar Tadas

नगर पंचायत कुही सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपवर जोरदार टीका

नागपूर, दि. 20 डिसेंबर 2021 :- प्रचारासाठी अवघे काही तास उरले असतांना शेवटच्या दिवशी नगर पंचायत कुही सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेल‍ा संबोधित करतांना राज्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष आहे, नागरिकांनी आपल्या तालुकाच्या सर्वांगीण विकासा करिता काँग्रेस ला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. राऊत यांनी भाजपा वर जोरदार टीका केली.

यावेळी बोलतांना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कुही नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने जे वचन जनतेला दिले आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. कुही तालुकाच्या विकासा करिता निधी कमी पडू देणार नाही.
पुढे बोलतांना म्हणाले काँग्रेस पक्ष हा संविधानाचा रक्षण करणारा पक्ष आहे, कधीही संविधानाची मान खाली होवू दिली नाही. याउलट भाजपनी अनेकदा संविधान बदलण्याची भाषा वापरली आहे. भाजपची विचारधाराच संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी आहे. भाजपच्या हातात सत्ता देऊ नका अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार राजू पारवे आणि काँग्रेस पक्ष‍ाचे १३ उमेदवार उपस्थित होते.

कुही तालुक्यात उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य येत असुन येथे पर्यटनाला गती मिळवून परिसरातील तरुणांना रोजगार देण्यात येईल. तालुक्याचा विकास करण्यात येईल. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. आंभोरा क्षेत्राचा विकास करण्यात येईल. ही निवडणूक महत्त्वाची आहे. कुही मध्ये काँग्रेस सत्तेवर येणार याचा मला विश्वास आहे असे डॉ. राऊत म्हणाले.

यावेळी नेमावली माटे सभापती समाज कल्याण, मनोज तितरमारे सभापती बाजार समिती, महादेव जिभकाटे उपसभापती बाजार समिती, सुरेश येरणे माजी नगराध्यक्ष, वंदना मोटघरे, हरिष कडव, विलास रार्घोते, मंगेश सातपुते, सुभाष खोरे, हर्षवर्धन निकोसे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *