आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते चनाखा येथे ग्रामपंचायत भवनाचे भुमीपुजन.

By : Mohan Bharti

राजुरा  :– राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील मौजा चनाखा येथे ग्रामपंचायत भवन निर्माण कार्याचे भुमीपुजन करण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चंद्रपूर ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत चनाखा येथे ग्रामपंचायत भवन बांधकामाकरिता अंदाजित किंमत २२,३५,२३५/- रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रसंगी सभापती मुमताज जावेद, पं. स सदस्य तुकाराम मनुसमारे, सरपंच रेखा आकनूरवार, उपसरपंच विकास देवाळकर , ग्रा. प. सदस्य राजेश सातपुते, प्रकाश दुर्योधन, ज्योत्सना वानखेडे, प्रतिभा मडावी, सुनील सातपुते, इर्शाद शेख, ग्रामसेवक मंजुषा पारखी, मुखायधापक सत्रे सर, भास्कर वाटेकर, संदीप कोंडेकर, भाऊराव आकनुरवार, शशिकांत वडस्कर, प्रेमिला कुळमेथे, बेबीताई वडस्कर, श्रद्धा पंचभाई, मनोज सातपुते, संदीप सातपुते, नीलकंठ लोखंडे यासह गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *