प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेता हरवला. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत आणि लढवय्या कार्यकर्ता, नेता आपल्यामधुन हरवला आहे. ते शेतकरी संघटनेचे जेष्ठ आणि निष्ठावंत नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दोनदा मानद सचिव, दोनदा सदस्य राहिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी ते आवारपूर येथून राजुरा येथे जात असताना अंबुजा सिमेंट कारखान्याजवळ त्यांच्या वाहनाची ट्रकला धडक बसल्याने त्यांच्या पायाला व मानेला गंभीर दुखापत झाली होती. नागपूर येथे त्यांचेवर उपचार सुरू होते. शेवटी आज त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर, नातेवाईकांवर, त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करतील आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करतील अशी आशा व्यक्त करून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *