नांदा-बिबी गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या खोलीकरण व साफसफाईची मागणी

 

By : Mohan Bharti

आमदार सुभाष धोटेंच्या माध्यमातून अल्ट्राटेकला निवेदन

गडचांदूर – शांती कॉलनी नांदा व रामनगर कॉलनी बिबी यादोन्ही वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणी वाहने बंद झाले आहे. पोकलेनद्वारे या नाल्याचे खोलीकरण व साफसफाई करुन देण्याची मागणी आमदार सुभाष यांच्या माध्यमातून अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.
दोन्ही वस्तीच्या मध्यभागातून वाहणाऱ्या या नाल्यांमध्ये पूर्णपणे कचरा साचला असून सतत दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या असून या नाल्याची साफसफाई व खोलीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नाल्यात घाणीचा विळखा पसरला असून लवकरात लवकर नाला सफाई करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर, नांदा ग्रामपंचायतचे सदस्य अभय मुनोत, बिबी ग्रामपंचायतचे सदस्य नरेंद्र अल्ली, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, हारून सिद्दिकी, गणेश लोंढे आदींनी अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक विजय एकरे व उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे यांच्याकडे केली आहे.
लवकरच नाला सफाई करून देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *