महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण – डॉ. नितीन राऊत

By. 👉. Shankar Tadas

*⭕महागाईविरुद्ध काँग्रेसने जनजगारण पदयात्रा काढत केला केंद्र सरकारचा निषेध*

नागपूर, दि. १८ डिसेंबर २०२१ :- केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बेहाल केले असल्याचा आरोप करीत आज नागपूरात काँग्रेसतर्फे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्रात असलेल्‍या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. प्रसंगी महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असल्याचे आरोप आज राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला. पदयात्रेत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सहभागी झाले होते. यावेळी बोलतांना केंद्र सरकारने पेट्रोल–डिझेल आणि गॅस या इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असल्याचा आरोप त्यांनी केल‍ा. घरगुती गॅस ची होत असलेली वाढ ही गृहिणीचे बजेट कोलमडून टाकायला कारणीभूत ठरत आहे सर्व क्षेत्रात महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील आता गरिबांना परवडत नाही त्यामुळे जगणे असह्य झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. युवकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. घरगुती गॅसच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे रिफिल करणे शक्य नसल्याने गोरगरीब महिलांनी पुन्हा जळते लाकूड गवऱ्या शोधायला सुरुवात केली आहे. लोकांना महागाईच्या खाईत लोटून टाकले जात आहे अशी टीका राऊत यांनी केली. यावेळी राजेंद्र करवाडे, कृष्ण कुमार पांडे, अनिल नगरारे, रत्नाकर जयपुरकर, ठाकुर जग्यासी, सुरेश जग्याशी, सुरेश पाटील, दिपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, दिनेश यादव, नेहा राकेश निकोसे, परसराम मानवटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पदयात्रा दुपारी १२ वा. बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयातून निघून दहा नंबर पुलिया, आवळे बाबू चौक, कमाल चौक, इंदोरा परिसरात भ्रमण करुन बेझनबाग येथे संपन्न झाली.
कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमध्ये मध्यमवर्गीय होरपळून निघाला आहे. त्यामुळे अच्छे दिन चे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र सरकारने त्वरित महागाई आणि बेरोजगारीच्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

*केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी*
पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. यात प्रामुख्याने महिला काँग्रेसची उपस्थिती लक्ष वेधणारी होती. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये इंधन दर वाढीचा निषेध करणारे फलक होते. या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला.

यावेळी असद खान, आसिफ शेख, सतीश पाली, गौतम अंबादे, विजयालक्ष्मी हजारे, महेन्द्र बोरकर, दौलत कुंगवानी, साहेबराव सिरसाट, तुषार नंदागवळी, निलेश खोब्रागडे, सचिन वासनिक, चेतन तरारे, पंकज सावरकर, ज्योती खोब्रागडे, विपुल महल्ले, सागर उइके, इरशाद शेख, बाबू खान, मंसूर खान, अनिरुद्ध पांडे, चेतन मेश्राम, मानिक वंजारी, विजया शेंडे, संगीता टेर्भुंणे, रेश्मा नंदागवळी, अकिल अफसर, जान जोसेफ, जयकुमार रामटेके, बेबी गौरीकर, सप्तर्षी लांजेवार, विलेश हुमने, किरन यादव, रेखा लांजेवार, बंडू़पंत टेर्भुंणे, शेषराव वासनिक, कुणाल निमगडे, सलीम मस्ताना, अजय वंजारी, सतीश चोकसे, सोनु खोब्रागडे, राकेश इखार, श्रीलज पांडे, श्रीकांत नायर, निशाद इंदुरकर, आकाश इंदुरकर, अभिलाष सिरसाट, राम यादव, दुर्गेश पांडे, भुषण पाली, गोविन्द गौरे, विलियम साखरे, तपन बोरकर, निखिल सहारे, गीता श्रीवास, सिंधू उके, खातीजा अली, कल्पना द्रोणकर, जयमाला सखते, चंद्रकांता साने, अंजु बावने, गौतमी नारनवरे, ज्योती गोलाईत, सुनंदा राऊत, अनिसा बेगम, नम्रता गजभिये, रंजना मेश्राम, आनंद सुर्यवंशी, शेख शहाब्बुद्दीन, सचिन डोहराने, जीतू वेलेकर, शाहिदा खान, जितेंद्र चव्हान, राजेश कोहाड, शेख सहाब्बुद्दीन, रामाजी ऊईके, नामदेव धोतरकर, दशरथ मालवी, संजय सहारे, मृणाल वडिचार, पप्पू यादव, सुनील सायरे, रवि सपाटे, सचिन गड़पायले, शेख अयूबभाई, मंसूर खान, संजय मेश्राम, प्यारेलाल देवांगन, संजय पेंदाम, अन्नू बेगम, राकेश मेहर, रशीद भाई , कल्पना गोस्वामी, दामोदर राऊत उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *