जोरदार पावसात एल्गार सेना यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन…

 

लोकदर्शन 👉अमरावती प्रतिनिधी-( मोहित राऊत)

*कुठल्याही मातंग समाज बांधव,सामाजिक संघटना,राजकीय पक्ष यांनी अभिवादन न करणे ही शोकांतिका – राजू मधुकरराव कलाने संस्थापक एल्गार सेना

 

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकरिता लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवाचे रान करून सिंहाचा वाटा हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दिला आहे. तसेच भारतातच नव्हे तर थेट परदेशात रशियामध्ये जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजाचे प्रबोधन करण्याचे नवीन माध्यम तत्कालीन काळामध्ये लोक हिताचे आणि प्रबोधनाचे कार्य त्यांनी त्या ठिकाणी केले. तेव्हा त्याच पार्श्वभूमीवर त्यांची जयंती व पुण्यतिथी संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते . मात्र दिनांक 17 जुलै 2022 रोजी पासून 18 जुलै 2022 पर्यंत सतत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी ही पावसाच्या पाण्याअभावी मातंग समाज बांधव तथा सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांनी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला तथा पोस्टर व पुतळ्याला हार अर्पण तर सोडा एक पुष्पगुच्छ ही मातंग समाजाचे असलेले अस्मिता अण्णाभाऊ साठे यांना अर्पण केले नाही. हा प्रकार अमरावती शहरांमध्ये आढळून आला आहे. तेव्हा या भर पावसा दरम्यान एल्गार सेनेचे संस्थापक राजू मधुकरराव कलाने यांनी ही विटंबना पहावनाशी झाल्याने जोराच्या जोरदार पाण्यामध्ये छोटीशी का होईना पुष्प अर्पण करून आपल्या कार्यकर्ता सहित भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात त्यांना यश आले. त्यांनी पुढे माध्यमांना सांगताना म्हणाले की निवडणुकीच्या वेळी तथा कुठल्याही सामाजिक कार्यक्रम असो अण्णाभाऊंना जाणीवपूर्वक दावल्या जाण्याची कारणे सांगत अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त हा विटंबनीचा प्रकार त्यांनीही एक शोकांतिका असल्याची माहिती दिली आहे. अभिवादन करतेवेळी एल्गार सेनेचे संस्थापक तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना आणि शहराध्यक्ष निलेश खडसे मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोहित राऊत सामाजिक कार्यकर्ता अभिषेक कलाने तथा असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मानवंदना अमरावती मधील गर्ल्स हायस्कूल चौक येथे देण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *