

By : Mohan Bharti
गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी गुरुवारी स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय ला भेट देऊन वार्षिक तपासणी केली. महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर ही संपूर्ण जिल्हा तील एक अव्वल दर्जाची नामवंत,शिस्तबद्ध शाळा म्हणून ओळखली जाते. संपूर्ण शाळेची तपासणी केल्या नंतर उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी समाधान व्यक्त केले, शाळेची प्रशंसा केली,याप्रसंगी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार ,पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,शोभा जीवतोडे, उपस्थित होत्या.