कुणाल राऊत ठरले ‘मोस्ट स्टायलिश यंग इमर्जिंग पॉलिटिशियन ऑफ महाराष्ट्र

लोकदर्शन ÷

 

*लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणून कुणाल राऊत यांचा गौरव*

*मुंबईत एका सोहळ्यात केला सत्कार*

मुंबई– लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित एका बहारदार सोहळ्यात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘मोस्ट स्टायलिश यंग इमर्जिंग पॉलिटिशियन ऑफ महाराष्ट्र’ (Lokmat’s Most Stylish- Young Emerging Politician of Maharashtra)
या पुरस्काराने राज्यातील युवा नेते कुणालदादा राऊत यांना गुरुवारी सन्मानित करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये लोकमत वृत्तपत्र समुहाने हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास लोकमत वृत्तपत्र समुहाचे प्रमुख विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. याशिवाय चित्रपट सृष्टीतील गुलशन ग्रोव्हर,रोहित शेट्टी, मनोज वाजपेयी, आनंद राय,सिद्धार्थ मल्होत्रा, सारा अली खान, सई ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवक राजकारण ते मंत्रीपद असा शून्यातून विश्व घडविणारा खडतर प्रवास पूर्ण करणारे जितेंद्र आव्हाड हे राजकीय क्षेत्रातील तरुणाईसाठी एक आदर्श आहेत.त्यांच्याहस्ते कुणाल राऊत यांना पुरस्कार प्रदान केला जाणे ही विशेष सन्मानाची बाब होती! “कोरोनात बळी गेलेले सर्व नागरिक, त्यांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणारे त्यांचे नातेवाईक व कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव कार्यरत तरुणाईला हा पुरस्कार मी अर्पण करतो!,”अशी भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना कुणाल राऊत यांनी व्यक्त केल्या.
“समाजसेवा आणि विकास हेच कोणत्याही नेत्यांची खरी स्टाईल असायला हवी असे मला वाटते. लोकमतने या पुरस्कारासाठी माझी निवड करून माझ्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. संकल्प या आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी कोरोना काळात ११ लाख लोकांना घरपोच भोजन पुरविले. तसेच नागपुरात 3 विलगीकरण केंद्रे चालवून गोरगरीब रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली.हा पुरस्कार म्हणजे या समाजकार्याचा गौरव आहे,”अशा शब्दांत त्यांनी आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.

लोकमत समूहाने या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे आभारही मानले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *