कन्हाळगाव येथे मतदार यादी वाचन ग्राम सभा संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 16:11:2021रोज मंगळवार 10:00 वाजता मतदार यादी वाचन करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका तथा माजीउपसरपंच कन्हाळगाव हे होते प्रमुख उपस्थिती श्री चिडे साहेब नायब तहसीलदार कोरपना,श्री अरुण पाटील नवले,श्री विनोद पाटील नवले,श्री कम्मलवार तलाठी साहेब,श्री गोवर्धन मडावी आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामसभा श्री नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व मतदार यादीचे वाचन,मयत नागरि, गाव सोडून गेले,गावात राहत नाही,मतदार यादीत नाव टाकने बाबत 30 डिसेंबर 2022 पर्यंत ज्यांच वय 18 वर्षे पूर्ण होत असेल त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात यावे याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही आक्षेप नोंदविण्यात आले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला, पुरुष उपस्थित होते ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली श्री चिडे नायब तहसीलदार साहेब यांनी ग्रामसभेत उपस्थिती दर्शवल्या बद्दल गावकर्यांनी त्यांचे आभार मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *