वर्षपुर्ती निमित्ताने युवा मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर।

*⭕युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता तत्पर राहून कार्य केले पाहिजे – आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार*
चंद्रपुर :-

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीच्या वर्षपूर्ती निमित्याने चंद्रपूरातील आय.एम.ए. सभागृहात “भाजयुमो संघटनात्मक आढावा” बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख
*आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या शुभहस्ते युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच जिल्ह्यातून ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रदेशात झाली त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना, भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नसून परिवार आहे. या परिवारात युवा मोर्चाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यापासुन तर गोर-गरीब, शोषित व पीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पदासाठी नव्हे तर सेवेसाठी समोर आले पाहिजे. तुम्हाला समाजातील अनेक अराजकीय तरुणांना पक्षाशी जोडता आले पाहिजे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण सहकार्य करावे. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आंदोलन किंवा कार्यक्रमात तुमच्यासारख्या युवा मित्रांची गर्दी त्या कार्यक्रमाला स्फुर्ती देत असते. खरेतर युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाच्या पाठीच्या कण्याप्रमाणेचं आहे. त्यामुळे आपण युवा मित्रांनी नेहमी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात मोठ्या जोशात उपस्थित राहून पाठीच्या कण्याप्रमाणे आधार देण्याचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी आपण नेहमी तत्पर असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.

यासोबतच जिल्हाध्यक्ष *देवराव भोंगळे* आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष *आशिष देवतळे* यांचेही यावेळी भाषणे झाली.
पार पडलेल्या कार्यक्रमात मंचावर, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, रघुवीर अहिर, अमित गुंडावार, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल डोंगरे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, महेश देवकते, इम्रान खान, सचिन नरड, श्रीनिवास जंगमवार, युवती आघाडी अध्यक्ष स्वातीताई देवाडकर तसेच विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मोहन कलेगुरवार आदींची उपस्थिती होती. त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले यामध्ये रामलालजी दोनाडकर, उपसरपंच ठाकरेजी, रोशन मुद्दमवार, लीलाराम राऊत, मनीषजी रामिल्ला यांचा समावेश होता.
याप्रसंगी भाजयुमोचे सर्व जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा सदस्य आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *